रत्नागिरी : दिनांक ३१.१०.२०२४ रोजी २०:४५ वा. चे सुमारास २२० के. व्ही. निवळी उपकेंद्र येथून ३३/११ के. व्ही. चाफे व खंडाळा उपकेंद्र यांना पुरवठा करणाऱ्या ३३ के. व्ही. चाफे वाहिनीचे १० पोल वादळी वारा व पाऊस यामुळे पडले. यामुळे गणपतीपुळे, जाकादेवी, मालगुंड, खंडाळा, जयगड व आजूबाजूच्या गावांतील सुमारे १८ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला होता.
काल दिनांक ०१.११.२०२४ रोजी १९:३० वा. पर्यंत सर्व १० पोल उभे करण्यात आले. तसेच २ पोलच्या वाहक तारा देखील जोडण्यात आल्या.
मात्र सायंकाळी पुन्हा वीजांसह झालेल्या जोरदार पाऊस पावसामुळे व अंधारामुळे नाईलाजाने काम थांबवावे लागले. उर्वरित ८ पोलच्या वाहक तारा दरीच्या बाजूला झाडांमध्ये अडकल्या कारणाने पोलला जोडता येणे शक्य झाले नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:07 PM 02/Nov/2024














