दापोलीहून मिरजेला जाणाऱ्या एसटी बसला अपघात

खेड : दापोलीहून मिरजेला जाणाऱ्या बसला कुवेघाटीनजीक ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला. हा अपघात शुक्रवारी (ता. १) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

दापोलीहून मिरजकडे जाणाऱ्या एसटीचे (एमएच-१४-बीटी-३६९०) ब्रेक निकामी होऊन अपघात झाला. या बसचे चालक संजय जाधव यांनी बसवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु बस रस्ता सोडून रस्त्याच्या डाव्या बाजूला रस्ता सोडून वीस फुट खोल खड्यात गेली. एसटीमध्ये अंदाजे पंचवीस प्रवासी प्रवास करीत होते. त्यातील एका प्रवाशाला गंभीर दुखापत झाली असून अन्य दहा प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. या प्रवाशांना फुरुस प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:27 PM 02/Nov/2024