नाटे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच सण उत्सवादरम्यान ग्रामीण भागासह शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जैतापूर येथे पोलिसांनी रूट मार्च काढला. रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सागरी पोलिस ठाणे नाटेच्या वतीने जैतापूर एसटी स्टँड, बाजारपेठ, मांजरेकर वाडी मार्गे पुन्हा एसटी स्टैंड असा रूट मार्च घेण्यात आला. यावेळी पोलिस निरीक्षक ए. वी. खेडकर, सहायक पोलिस निरीक्षक अविनाश केदारी, नाटे कार्यक्षेत्रातील सर्व दृरक्षेत्रांचे पोलिस अंमलदार पोलिस, केंद्रीय राखीव सुरक्षा बलचे जाधव आणि सुरक्षा दलाचे सर्व जवान सहभागी झाले होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:53 PM 02/Nov/2024














