रत्नागिरी : गावखडीत ऐन दिवाळीत महावितरण ची बत्ती गुल

गावखडी : दिवाळीच्या सणात गेली दोन-तीन दिवस वारंवार महावितरण ची बत्ती गुल होत असून जनतेला वेठीस धरत आहेत याप्रकरणी संबंधित विभाग जाणून बुजून जनतेला वेठीस धरत असून अधिकारी कर्तव्यात कसूर करत असून अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीचे पावस विभाग अध्यक्ष संतोष पोकळे यांनी केली आहे दिवसे दिवस महावितरण की व्यवस्था अधिकच खिळखिळी आणि ढिसाळ झाले असून त्यावर उपाययोजना करण्यास संबंधित अधिकारी टाळाटाळ करत आहेत.

गेली दोन-तीन वर्ष संबंधित विभागाकडे मागणी करून सुद्धा त्यांची व्यवस्था आजपर्यंत सुधारणा झालेली नाही स्वभाव याला सर्वस्वी जबाबदार यांचे अधिकारी असून पावस शाखा अधिकारी व कार्यकारी अभियंता यांची त्वरित उचल बांगडी करावी अशी मागणी जनतेतून जोर धरत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:04 PM 02/Nov/2024