खेड : भरणेसह सुसेरी नं. १ येथे दारूधंद्यावर धाड

खेड : खेड तालुक्यातील भरणे व सुसेरी नं. १ येथे गावठी. हातभट्टीच्या दारूधंद्यांवर पोलिसांनी धाडी टाकत दोघांना रंगेहाथ पकडले. भरणेतील एका घरात गावठी हातभट्टीच्या दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने टाकलेल्या धाडीत ३,५७० रूचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.

संजय मधुकर जगदाळे (भरणे) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तो गावठी हातभट्टीच्या दारूची विनापरवाना विक्री करत होता. ३० लिटर गावठी हातभट्टीच्या दारूसह त्याला रंगेहाथ पकडले. सुसेरी नं. १- साठेवाडी येथेही पोलिसांनी गावठी हातभट्टीच्या दारू अड्ड्यावर धाड टाकली. या प्रकरणी संदेश विलास माने (रा. सुसेरी नं.१- साठेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्याकडून ७,०१० रू. किंमतीची ७० लिटर गावठी हातभट्टीची दारू पोलिसांनी जप्त केली. पोलीस शिपाई राहुल कोरेंनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:44 PM 02/Nov/2024