खेड : कोकणातील मराठा समाजातील नेतृत्व अशी ओळख असलेले केशवराव जगतराव भोसले यांचे दि. २३ रोजी अल्पशा आजाराने वयाच्या ८४ वर्षी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी निधन झाले. मंगळवारी सकाळी ११ वाजता तेथेच त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. खेड तालुक्यातील खोपी गावातील मूळचे रहिवासी असलेले केशवराव भोसले हे कोकणाविषयी अतिशय जिव्हाळा असलेले व्यक्तिमत्त्व होते. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासोबत त्यांनी अनेक वर्षे कॉंग्रेस पक्षात काम केले. सन १९९० मध्ये त्यांनी खेड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढली होती. त्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. मराठा समाजाच्या संघटनेत काम करताना केशवराव भोसले राजकारणात कधी फारसे रमले नाहीत.
गेल्या काही वर्षांपासून ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेत कार्यरत होते. त्यांची मुलगी दुर्गा ही युवासेनेत सरचिटणीसपदी काम करत होती. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कोकणातील मराठा समाजाच्या वतीने यांनी स्पष्ट भूमिका घेतली होती. मराठा समाजासाठी त्यांचे सातत्याने चिंतन असे. दिवंगत केशवराव भोसले पश्तात पत्नी, मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:00 PM 24/Sep/2024