रत्नागिरी : भारतीय परिचर्या परिषदेने परिचारिकाविषयक विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ दिली आहे.
प्रवेश प्रक्रियेसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे परिषदेने जाहीर केले आहे.
बीएस्सी नर्सिंग, एम.एस्सी. नर्सिंग, सहायक परिचारिका प्रसाविका (एएनएम), सामान्य परिचर्या व प्रसाविका (जीएनएम), पदवीपूर्व सामान्य नर्सिंग (पीबीबीएस्सी नर्सिंग), पोस्ट बेसिक डिप्लोमा आणि क्रिटिकल केअरमधील परिचारिका अभ्यासक्रम (एनपीसीसी) आदींसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत प्रवेश घेता येणार आहे.
शैक्षणिक वर्षासाठी परिचारिकाविषयक विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू आहे. सप्टेंबरमध्ये प्रवेश परीक्षा अखेरच्या टप्प्यात असताना भारतीय परिचर्या परिषदेने या संपूर्ण प्रवेश प्रक्रियेला एक महिन्याची मुदतवाढ दिली होती. त्यानुसार राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने ३१ ऑक्टोबरपर्यंत या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला मुदतवाढ दिली होती. ही मुदत संपत आली असताना भारतीय परिचर्या परिषदेने पुन्हा एकदा परिचारिकाविषयक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 04-11-2024














