रत्नागिरी : लायन्स क्लबचे सदस्य चंद्रशेखर पटवर्धन यांचे वडील प्रभाकर रघुनाथ तथा अण्णा पटवर्धन यांनी दिवंगत पत्नी कै. प्रतिभा हिच्या स्मृती जपण्याच्या हेतूने लायन्स क्लबच्या नियोजित हॉस्पिटल इमारतीला अडीच लाखाच्या देणगीचा चेक ट्रस्ट अध्यक्ष डॉ. संतोष बेडेकर यांच्याकडे सुपूर्द केला.
अण्णा पटवर्धन यांनी हॉस्पिटलला भेट दिली. हॉस्पिटलची नियोजित इमारत पाहिली. हॉस्पिटलचे कामकाज पाहिले. लायन्सच्या चाललेल्या सेवाभावी कार्याची माहिती घेतली. कामकाज पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. समाजाने आपल्यावा मोठे केले. त्या समाजाचं ऋण फेडण्याचा छोटासा प्रयत्न मी केला आहे, असे अण्णा पटवर्धन यांनी यावेळी सांगितले.सर्व लायन्स ट्रस्ट संचालक मंडळाच्या वतीने अण्णा पटवर्धन यांचा सन्मान करण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:53 04-11-2024














