रत्नागिरी : भारत सरकारच्या कौशल्य विकास विभागातर्फे ४ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत देवरूख येथे मोफत लाइफ गार्ड सर्टिफिकेट कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे.
दिवाळीची सुट्टी योग्य मार्गाने उपयोगात यावी, या हेतूने देवरूखच्या खालची आळीमधील नक्षत्र मंगल कार्यालयात ४ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत प्रशिक्षण होणार आहे.
अडचणीच्या वेळी दुसऱ्याला मदत करताना स्वतः प्रशिक्षित असणे आवश्यक आहे. या प्रशिक्षणाचा उपयोग स्वतःसाठी आणि दुसऱ्याचा जीव वाचविण्यासाठी होणार आहे. या प्रशिक्षणासाठी प्रवेश मर्यादित असून दहावी ऊत्तीर्ण १८ ते ४५ वयोगटातील स्त्री-पुरुषांना यामध्ये सहभागी होता येणार आहे. आधारकार्ड, दहावी उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र, पासपोर्ट साइज फोटो या कागदपत्रांची आवश्यकता आहे.या कोर्सविषयी अधिक माहितीसाठी युयुत्सु आर्ते (9422351926) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:01 PM 04/Nov/2024














