NICL Assistant Jobs 2024 : विमा कंपनीत जम्बो भरती

NICL Assistant Jobs 2024 : नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (NICL) ने सहाय्यक पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी कंपनीच्या अधिकृत वेबसाइट nationalinsurance.nic.co.in वर भेट देऊन 11 नोव्हेंबरपर्यंत अर्ज सबमिट करू शकतात. तसेच 24 ऑक्टोबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.

कंपनीने सहाय्यक पदांच्या एकूण 500 जागांसाठी अर्ज मागवले असून महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ, तामिळनाडू, दिल्ली यासह अनेक राज्यांमध्ये ही पदे भरण्यात येणार आहेत. उमेदवार विहित अंतिम तारखेला किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवारांची वयोमर्यादा काय असावी तसेच पात्रता आणि निवड कशी केली जाईल याबद्दल जाणून घ्या.

उमेदवारांची पात्रता
सहाय्यक पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षे असावे. कमाल वयोमर्यादेत ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षांची आणि एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे. अर्जदाराचे वय 1 ऑक्टोबर 2024 पासून मोजले जाईल.

अर्जाची फी
सर्वसाधारण आणि ओबीसी प्रवर्गासाठी अर्ज शुल्क 850 रुपये निश्चित करण्यात आले आहे. तर एससी, एसटी आणि अपंग प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क जमा करावे लागेल.

या पदांकरिता करा अर्ज
विमा कंपनीच्या Nationalinsurance.nic.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

होम पेजवर दिलेल्या Recruitment पर्यायावर क्लिक करा.

आता येथे सहाय्यक भरतीच्या अर्ज करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

आता तपशील प्रविष्ट करा आणि यात सांगितलेली आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

त्यानंतर फी भरून फॉर्म सबमिट करा.

अशी होणार निवड
या पदासाठी निवड करण्यासाठी खास प्रक्रिया अवलंबण्यात येणार आहे. मुख्य परीक्षा आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनद्वारे उमेदवाराची निवड केली जाणार आहे. 100 मार्कांची ही प्राथमिक परीक्षा होणार आहे. त्यासाठी 60 मिनिटाचा वेळ देण्यात आला आहे. या परीक्षेत पास झालेल्या उमेदवारांना मेन्स एग्झाममध्ये सहभागी करून घेतलं जाणार आहे. मुख्य परीक्षा 200 मार्काची असेल. त्यासाठी 120 मिनिटाचा वेळ दिला जाईल. दोन्ही परीक्षा ऑनलाईन होणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:41 PM 04/Nov/2024