संगमेश्वर : तालुक्यातील मानसकोंड येथील 26 वर्षीय विवाहितेचा विंचू दंशाने मृत्यू झाल्याची घटना रविवार 3 ऑक्टोबर रोजी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास घडली. मंजिरी वैभव फेपडे (26, मानसकोंड, फेपडेवाडी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तिच्या जाण्याने ऐन भाऊबीजेलाच मानसकोंड गावावर शोककळा पसरली आहे. तिला दीड वर्षाची मुलगी आहे.
सविस्तर वृत्त असे की, मंजिरी ही घराच्या मागच्या पडवीच्या पायरीवर बसलेली असताना शुकवारी सायंकाळी 5 वाजता तिला विंचू दंश झाला. तिला रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. शनिवारी सायंकाळच्या सुमारास तिला अचानक श्वसनाचा त्रास जाणवू लागला. डॉक्टरानी तिला कोल्हापूर येथे हलवण्यास सांगितले. कोल्हापूर येथे उपचारासाठी नेताना रविवारी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. तिच्या या मृत्यूची माहिती मिळताच गावावर शोककळा पसरली. मंजिरी हीचे मानसकोंड येथेच माहेर, सासर आहे. तिला दीड वर्षाची मुलगी असल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:51 04-11-2024














