गुहागरात सात उमेदवार निवडणूक रिंगणात

गुहागर : विधानसभा मतदारसंघातील नऊ पैकी दोन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघार घेतले. आता निवडणूक रिंगणात सात उमेदवार आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये आरपीआय आठवले गटाचे संदेश दयानंद मोहिते आणि भाजपचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवारी अर्ज भरणारे संतोष जैतापकर यांचा समावेश आहे.

गुहागर विधानसभा मतदारसंघातून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमोद सीताराम गांधी (रेल्वे इंजिन), उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे भास्कर भाऊराव जाधव (मशाल), शिवसेनेचे राजेश रामचंद्र बेंडल (धनुष्यबाण), या मान्यताप्राप्त पक्षांसह नोंदणीकृत राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमोद परशुराम आंब्रे (ऑटो रिक्षा), अपक्ष उमेदवार संदीप हरी फडकले (बॅट), मोहन रामचंद्र पवार (शिट्टी) आणि सुनील सखाराम जाधव (अंगठी) हे सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी महायुतीतील घटक असलेले आरपीआयचे आठवले गटाचे अपक्ष उमेदवार संदेश दयानंद मोहिते व भाजपचे अपक्ष उमेदवार संतोष लक्ष्मण जैतापकर दोन्ही उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 AM 05/Nov/2024