राजापूर : राजापूर विधानसभा मतदार संघात उमेदवारी मागे घ्यायच्या दिवशी अपक्ष उमेदवार राजश्री यादव यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता आठ उमेदवार रिंगणात असून, मतदार संघातील बलाबल पाहता तिरंगी लढत होईल, असे चित्र स्पष्ट झाले आहे.
दरम्यान महायुतीसह महाविकास आघाडी आणि अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या अविनाश लाड यांच्या उमेदवारीमुळे तिरंगी लढत होणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे मतदार संघातील चुरस वाढली आहे.
राजापूर विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार राजन साळवी, महायुतीच्या वतीने सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण सामंत, महाविकास आघाडीतून रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेससाठी एकही सीट न सोडल्याने संतप्त होऊन अपक्ष उमेदवारी दाखल केलेले जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अविनाश लाड यांच्यासह अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेले संजय यादवराव, अमृत तांबडे, राजश्री संजय यादव, संदीप जाधव, यशवंत हर्याण, राजेंद्र रवींद्रनाथ साळवी अशा नऊ उमेदवारांचा समावेश होता. त्यापैकी राजश्री यादव यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता आठ उमेदवार रिंगणात राहिले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 AM 05/Nov/2024