लांजा : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने दरवर्षी वाङमयीन व वाङमयेतर पुरस्कार प्रदान केले जातात. कोकण मराठी साहित्य परिषद लांजा शाखेने सातत्याने मराठी भाषा आणि मराठी साहित्य चळवळ वृद्धीगत करण्यासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांची दखल घेत यावर्षी कोकण मराठी साहित्य परिषदेच्यावतीने दिला जाणारा वामनराव दाते उत्कृष्ट शाखा पुरस्कारासाठी लांजा शाखेची निवड करण्यात आली आहे.
मराठी भाषा आणि साहित्य चळवळ सुरू ठेवण्यासाठी लांजा शाखेचे अध्यक्ष रामचंद्र जाधव, उपाध्यक्ष डॉ. माया तिरमारे, कार्यवाह प्रकाश हर्चेकर, सहकार्यवाह भीमराव खोत, कोषाध्यक्ष शहाजीराव देशमुख, जिल्हा प्रतिनिधी बाळू नागरगोजे, युवाशक्ती विभाग प्रमुख प्रवीण कांबळे, महिला विभाग प्रमुख सविता पाटील, जनसंपर्क प्रमुख दत्तात्रय देसाई, प्रसिद्धी प्रमुख संदेश कांबळे, कार्यकारिणी सदस्य रिया लिंगायत, मनीषा पाटील, सुधाकर कांबळे, प्रभाकर गवाणकर, नारायण कदम, काशिराम जाधव, सुलभा पोकळेकर, नसीमा मुलाणी, रामचंद्र लांजेकर, सल्लागार आदम मापारी, वसंत देसाई, गजानन जगताप, आदीं मेहनत घेत आहेत. कोकण मराठी साहित्य परिषद शाखा लांजाला वामनराव दाते उत्कृष्ट शाखा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शाखेचे सर्वच स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 AM 05/Nov/2024














