मुंबई : तामिळनाडू मध्ये “खेलो इंडिया” लीग तायक्वांदो स्पर्धा संपन्न झाली. तामिळनाडू मध्ये भारत सरकारच्या मान्यतेने पार पडलेल्या खेलो इंडिया वुमेन्स लीग तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्र मुलींनी १० सुवर्णपदके जिंकली आहेत, अशी माहिती महाराष्ट्र संघटनेचे महासचिव श्री मिलिंद पठारे यांनी दिली.
तायक्वांदो हा ऑलिम्पिक क्रीडा प्रकार असून शालेय क्रीडा स्पर्धा , विद्यापीठ क्रीडा स्पर्धा, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, पोलीस क्रीडा स्पर्धा अशा शासकीय स्पर्धांसोबतच आता “अस्मिता खेलो इंडिया वुमन्स लीग” मध्येही तायक्वांदो खेळाचा मागील २ वर्षीपासून समावेश झाला आहे. तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया या अधिकृत राष्ट्रीय संघटनेकडे या ‘ खेलो इंडिया ’ तायक्वांदो स्पर्धेची तांत्रिक जबाबदारी शासनाकडून देण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेळाडूंनी नेहमीच राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे .
महाराष्ट्र संघातील मुलींनी खेलो इंडिया वुमन्स स्पर्धेत रत्नागिरीच्या गणराज क्लबच्या कु. त्रिशा साक्षी सचिन मयेकर ( ज्युनियर वजनी गट ४४ किलो आतील) सुवर्ण पदक व कु. गौरी सारिका अभिजित विलणकर (कॅडेट ५५ किलो आतील वजनी गट) कांस्य पदक प्राप्त केले आहे. खेळाडूंनी या खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदके जिंकून सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. या स्पर्धेत प्रवीण सोनकुल ( पुणे) यांनी महाराष्ट्र संघ प्रशिक्षक म्हणून उत्कृष्ट काम केले. त्रिशा व गौरी ला सौ. आराध्या प्रशांत मकवाना याचे मार्गदर्शन लाभत आहे.
खेलो इंडिया स्पर्धेत पदके जिंकल्याबद्दल उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी त्रिशा व गौरी शुभेच्छा दिल्या, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबईचे अध्यक्ष डॉ अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, कोषाध्यक्ष वेंकटेश कररा, उपाध्यक्ष निरज बोरसे, दुलीचंद मेश्राम, प्रवीण बोरसे, सहसचिव सुभाष पाटील, कार्यकारणी सदस्य अजित घार्गे, सतीश खेमस्कर ,जिल्हा सघंटनेचे सचिव लक्ष्मण के, खजिनदार शंशाक घडशी, तसेच गणराज क्लब चे पदाधिकारी अभिजित विलणकर, नुतन किर, रंजना मोडूंळा, साक्षी मयेकर, कनिप्का शेरे, यशंवत शेलार, पुजा कवितके, एस.आर.के चे प्रशिक्षक शाहरुख शेख, जयभैरीचे प्रशिक्षक मिलिंद भागवत आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:30 24-09-2024