चिपळूण : फटाक्याची ठिणगी पडून घरावरील प्लास्टिक कागद जळाला

चिपळूण : शहरातील उपनगर काविळतळी गांधीनगर वसाहतीत रविवारी (दि. ३) सायंकाळच्या सुमारास फटाक्याची ठिणगी उडून घरावर आच्छादन केलेले प्लास्टिक कापड जळण्याची घटना घडली आहे. मात्र, वेळीच आग विझविल्याने मोठी दुर्घटना टळली. तसेच नुकसानही झाले नाही. काविळतळी परिसरात असलेल्या गांधीनगर या दाटीवाटीच्या रहिवास वस्तीमध्ये रविवारी सायंकाळी ७:३० च्या सुमारास फटाक्याची ठिणगी उडून एका घराच्या छप्परावर पावसापासून संरक्षणासाठी टाकण्यात आलेल्या प्लास्टिक कागदाने पेट घेतला. सायंकाळच्या सुमारास परिसरात काही मुले फटाके वाजवत होती. यातील एका फटाक्याची ठिणगी प्लास्टिकवर पडल्याने या प्लास्टिकने पेट घेतला. या ठिकाणी अत्यंत दाटीवाटीची वस्ती असून छोटी कौलारू घरे दाटीवाटीने उभी आहेत. घराच्या कौलावर पावसाच्या पाण्यापासून संरक्षणासाठी प्लास्टिक टाकण्यात आले होते. हे प्लास्टिक फटाक्याच्या ठिणगीने पेटले. मात्र, आजूबाजूच्या रहिवाशांनी तातडीने पाणी मारून व प्लास्टिक बाजूला करून आग विझविली.सांगण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 AM 05/Nov/2024