रत्नागिरी : रत्नागिरी शहरात तीन ठिकाणी अंतर्गत जलवाहिनी फुटण्याचे प्रकार वरचेवर घडतच असतात. जलवाहिनी फुटण्याच्या कारणांचा मात्र अजून उलगडा झालेला नाही. आता मारुती मंदिर येथे नाचणेकडे जाणाऱ्या मार्गावर जलवाहिनी फुटली. काँक्रिट रस्त्याच्या खाली फुटलेली जलवाहिनी रस्त्याच्या कडेने खोदन काँक्रिट रस्त्याच्या खाली बोगदा करून जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू होते.
रत्नागिरी शहरात जयस्तंभ, मारूती मंदिर येथे नाचणेकडे जाणाऱ्या मार्गावर आणि विशेष कारागृहाच्या समोर जलवाहिनी फुटण्याच्या घटना घडत आहेत. याठिकाणी रस्त्याची खोदाई करूनच जलवाहिनी दुरुस्ती करावी लागते. त्यामुळे या तीन ठिकाणच्या रस्त्यावर मातीचा थर किंवा ज्या ठिकाणी दुरूस्तीनंतर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे तेथे रस्ता खचलेला दिसतो. सुमारे दोन आठवड्यांपूर्वी रामआळी जलवाहिनी फुटली होती तेथे दुरूस्ती करण्यासाठी रस्त्याची खोदाई करण्यात आली होती त्या ठिकाणी मातीचा थर आहे तसाच होता.
मारूती मंदिर येथे फुटलेली जलवाहिनी शोधण्यासाठी रस्त्याच्या कडेला खोदाई करावी लागली. खोदाई केल्यानंतर कॉक्रिट रस्त्याखाली जलवाहिनी फुटल्याचे दिसन आले त्यामुळे रस्त्याच्या कडेने केलेल्या खड्यातून काँक्रीटखाली बोगदा खोदन तेथील दुरूस्ती करावी लागली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 AM 05/Nov/2024









