गुहागर : गुहागर तालुक्याची आर्थिक राजधानी असलेल्या शृंगारतळीत विना नंबर प्लेटच्या वाहनांचा वापर वाढला आहे. मात्र, याकडे सबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. अशा चालकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
शहरात सध्या भंगार व्यवसाय तेजीत असून, या भंगारामधून दिवसाकाठी लाखोंची उलाढाल होत असल्याचे दिसत आहे. भंगार गोळा करण्याच्या व्यवसायावर तालुक्यातील अनेक परप्रांतीयांचा उदरनिर्वाह चालतो. दर दिवशी हे परप्रांतीय कामगार परिसरातून भंगार गोळा करून त्यावर लाखो रुपये कमावत आहेत. शृंगारतळी बाजारपेठेत बिनधास्त भंगार गोळा करणारे कामगार विना नंबर प्लेटच्या जुन्या वाहनाने भंगार नेतान रस्त्यावरून दिसून येतात. मात्र, याकडे पोलिस यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
विशेष म्हणजे या भंगार व्यावसायिक कामगारांकडे काही गाड्यांना नंबर प्लेट नाही तर काही गाडीचे नंबर पूर्णपणे गेलेले असूनही कोणतीही भीती न बाळगता बिनधास्त भर बाजारपेठेतून हे व्यावसायिक वाहन चालवितात. यामुळे अशा विना नंबर प्लेटचे वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 AM 05/Nov/2024














