रत्नागिरी : तालुक्यातील शिवार आंबेरे हातिसकरवाडी येथील हातभट्टीवर धाड टाकत पूर्णगड पोलिसांनी तब्बल ११५० लिटर गुळ नवसागर मिश्रीत कुजके रसायन आणि गावठी हातभट्टीची ९५ लिटर दारु असा एकूण ५४ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
ही कारवाई शुक्रवार १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.५५ वा. करण्यात आली. वैभव चंद्रकांत मयेकर (४३) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. संशयित हा आपल्या ताब्यात गुळ नवसागर मिश्रीत रसायन आणि गावठी दारु विक्रीसाठी बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 AM 05/Nov/2024














