रत्नागिरी : तालुक्यातील नेवरे येथे गावठी हातभट्टीची ५ लिटर दारू विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगणाऱ्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवार ३ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वा. करण्यात आली. बाळकृष्ण पवार (६८, रा. धामणसे, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. रविवारी दुपारी तो आपल्या ताब्यात ५५० रुपयांची ५ लिटर गावठी दारू विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:41 AM 05/Nov/2024














