लांजा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढावी, या उद्देशाने लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघामधील लांजा महाविद्यालयात स्वीप पथकामार्फत जनजागृती करण्यात आली. यावेळी नवीन मतदारांमध्ये मतदानाविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा आणि मतदानात मोठा सहभाग नोंदवावा यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले. यावेळी स्वीप पथकाचे प्रमुख व नोडल अधिकारी विनोद सावंग यांनी विद्यार्थ्यांना आपले मत लोकशाहीमध्ये किती महत्त्वाचे आहे हे पटवून सांगितले.
तसेच संविधानाने दिलेला पवित्र हक्क मतदारांनी निःसंकोचपणे बजवावा, असे आवाहन करतानाच अजूनही कोणी मतदार नोंदणी केली नसेल तर नोंदणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यावेळी विद्यार्थ्यांनी आम्ही सर्वजण मतदानाचा हक्क बजावणार असे सांगितले. यावेळी लांजा येथील कला, विज्ञान व वाणिज्य विद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील चव्हाण तसेच स्वीप आयकॉन व एनएसएसचे जिल्हा समन्वयक डॉ. राहुल मराठे, प्रा. प्राची बामणे व स्वीप पथकाचे विजय विश्वासराव, दिलीप चव्हाण, सुनील खांडेकर, प्रदीप मडवी यांसह प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 AM 05/Nov/2024














