चिपळूण : महाविकास आघाडीच्या जागा वाटपात रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेसला एकही जागा मिळाली नसली, तरी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कोणीही नाराज होऊ नका, असे सांगितले असून, आम्ही कोणीही नाराज नाही. चिपळूण मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांचे आम्ही संघटितपणे प्रयत्न करणार असल्याचे काँग्रेसचे नेते सहदेव बेटकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
गत विधानसभा निवडणुकीत गुहागर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवताना सहदेव बेटकर यांनी सुमारे ५२ हजार मते घेतली होती. त्यांनी काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला होता. महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्याबाबत भूमिका मांडताना बेटकर म्हणाले, महाविकास आघाडीतर्फे यादव यांना उमेदवारी मिळाली आहे. आम्ही महाविकास आघाडीचा धर्म म्हणून सर्वजण प्रामाणिकपणे काम करणार आहोत. जिल्ह्यात काँग्रेसला एकही जागा मिळाली नसली, तरी कोणी नाराज नाही. येथील कार्यकर्ते एकदिलाने प्रचाराचे काम करत आहेत. जिल्ह्यात काँग्रेस वाढला पाहिजे, अशी आपली भावना आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 AM 05/Nov/2024














