राजापूरमध्ये नेत्यांच्या कोपरा सभांवर जोर; वाडीवस्तीवर मतदारांच्या भेटीगाठी

राजापूर : निवडणुकीच्या आखाड्यातील लढतींचे चित्र स्पष्ट होण्यापूर्वीच प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार, ताकदवार अपक्षांसह त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराची राळ उडविली आहे. छोट्या-छोट्या कोपरा सभांसह वाडीवस्तीवर जाऊन मतदारांच्या – भेटीगाठी घेण्यावर सध्या साऱ्यांनीच भर दिला आहे.

अलीकडच्या काळामध्ये काही नव्या पिढीतल्या मुलुखमैदानी तोफाही राजापुरात प्रचार काळामध्ये धडाडल्या आहेत. अशाच सध्याच्या घडीच्या विविध राजकीय पक्षांमधील मुलुख मैदानी तोफा राजापुरात प्रचारादरम्यान धडाडणार का, याची साऱ्यांना उत्सुकता आहे. या संदर्भात उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडे कानोसा घेतला असता बड्या नेत्यांच्या सभा होणार नसल्याची शक्यता त्यांच्याकडून वर्तविण्यात येत आहे. बड्या नेत्यांपेक्षा स्थानिक नेत्यांच्या सभा आणि त्यांच्या मार्गदर्शनावर भर राहणार असल्याचे त्यांच्याकडून सांगितले जाते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:11 PM 05/Nov/2024