संगमेश्वर : संगणक परिचालकांकडून निराधारांची दिवाळी गोड

कडवई : संगमेश्वर तालुक्यातील काही संगणक परिचालकांनी सामाजिक भान राखत तालुक्यातील दोन कुटुंबांना फराळ देत त्यांची दिवाळी गोड केली. साक्षी शिंदे, सानिद्रा पांचाळ, रीमा मोने, सेजल मयेकर, निधी माने आणि अजित सुर्वे यांनी रेवती पंडित यांच्या समवेत स्वखर्चातून फराळ आणला. बुरंबाड येथील उर्मिला आणि मारुती डिंगणकर तसेच माभळे येथील जयश्री आणि दत्ताराम येद्रे ह्या कुटुंबाला फराळ तसेच पणत्या, उटणे आणि साबण देण्यात आले. संगमेश्वर येथील अमोल शेट्ये यांनीही यासाठी सहकार्य केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:18 PM 05/Nov/2024