खेड बसस्थानकाच्या छत डागडुजीला प्रारंभ

खेड : येथील खेड बस स्थानकाच्या छत डागडुजीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. रविवारपासून छतावरील जुनाट पत्रे काढून नवीन पत्रे बसवण्याचे काम हाती घेतले आहे. बसस्थानकाची रंगरंगोटी करून नवा साजही देण्यात येणार आहे. स्थानकातील जागोजागी पडलेले खड्डे काँक्रिटीकरणाने बुजवण्यात येणार असल्याने प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. गेली अनेक वर्षे बसस्थानकाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्षच केले होते.

प्रशासनाने डागडुजीबाबत टीकेची झोड उठूनही हाताची घडी अन् तोंडावर बोट ठेवण्यातच धन्यता मानली होती. छताची बिकट अवस्था असून पत्रे कोसळून दुर्घटना घडण्याचा धोकाही होता.

बसस्थानकातील छताच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असून अंतर्गत डागडुजीही केली जाणार आहे. जुने पत्रे काढून त्या ठिकाणी नवीन पत्रे बसवण्यात येणार आहेत. बसस्थानकातील खड्डे कॉक्रिटीकरणाने बुजवले जाणार आहेत. तसेच बसस्थानकाला रंगरंगोटीही केली जाणार आहे. या साऱ्या कामांसाठी ८ ते १० दिवसांचा कालावधी लागणार आहे. ८ ते १० दिवसातच ही सर्व कामे पूर्ण होतील. अखेर दीपावलीच्या पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनाला बसस्थानकाच्या दुरुस्तीसाठी सवड मिळाली आहे. बसस्थानकाच्या छताची डागडुजी करण्यासाठी जुनाट पत्रे काढून त्या ठिकाणी नवीन पत्रे बसवण्यात येणार आहेत. अंतर्गत कामेदेखील करून प्रवाशांवरील धोक्याची टांगती तलवार दूर केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:27 PM 05/Nov/2024