नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मदरसा कायद्याला (madrasa act) सुप्रीम कोर्टानं ( supreme court) मान्यता दिली आहे. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय रद्द केला आहे.
मदरशांचा मुख्य उद्देश शिक्षण देणं हाच असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. धार्मिक शिक्षणापासून विद्यार्थ्यांना रोखू शकता येणार नाही. मदरसा कायदा पूर्णपणे राज्यघटनेच्या अंतर्गत असल्याचं कोर्टांन म्हटलं आहे. तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे.
कोर्टानं दिलेल्या निर्णयानुसार, मदाशांची मान्यता नाकारता येणार नाही असे देखील कोर्टानं म्हटलं आहे. मात्र, मदरशांमध्ये योग्य सोयी-सुविधा असाव्यात आणि शिक्षणाची काळजी घेतली जावी, असे देखील सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. मदरसा कायदा ज्या भावनेने आणि नियमाखाली बनवण्यात आला, त्यात कोणताही दोष नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे याला घटनाबाह्य म्हणणे योग्य नाही. दरम्यान, उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला राज्यातील विविध मदरशांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना औपचारिक शिक्षण व्यवस्थेत समाविष्ट करण्याचे निर्देश दिले होते. 5 एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने ‘उत्तर प्रदेश मदरसा शिक्षण मंडळ कायदा-2004’ रद्द करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती देऊन सुमारे 17 लाख मदरसा विद्यार्थ्यांना दिलासा दिला होता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:14 05-11-2024