माखजन : रत्नागिरी तालुक्यातील नवनियुक्त शिक्षण सेवकांचे ४ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
हे प्रशिक्षण रत्नागिरीतील रा. भा. शिर्के हायस्कुल येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होत आहे. या प्रशिक्षणात तज्ञ मार्गदर्शक म्हणून मानसी चव्हाण (पटवर्धन हायस्कुल), विष्णू पवार (केंद्र झरे वाडी), समृद्धी गोणबरे ( निवेडी वरची), रामदास चव्हाण (ओरी नं १), श्वेता कवीतके (पं. स. रत्नागिरी), खलिदा जमादार (पं. स रत्नागिरी), अमर घाडगे (केंद्र शिरगाव), मानसी मोने (वेतोशी नं २), अनिल शेट्ये (न.प.क्र.१५) सुधीर शिंदे (कृ.चि. आगाशे विद्यामंदीर), संगीता पवार (पं.स रत्नागिरी), श्रीम. देवयानी पवार (पं. स रत्नागिरी), गोविंद तारवे (केंद्र खानू), सुहास वाडेकर (नाखरे नं १) विभा बाणे (तोणदे), संतोष गार्डी (अ. के. देसाई हायस्कुल रत्नागिरी) दिगंबर घवाळी (नेवरे देवपाट) अश्विनी काणे (पं.स रत्नागिरी), दीपाली जंगम (पं. स रत्नागिरी), आदी काम पहात आहेत.
या प्रशिक्षणा दरम्यान नवीन शैक्षणिक धोरण या विषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे. या प्रशिक्षणात सुमारे १५० शिक्षणसेवक सहभागी झाले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:37 PM 05/Nov/2024














