◼️ रत्नागिरीकरांची गर्दी, तरुण, तरुणींच्या हस्तकौशल्याचे होतेय कौतूक
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील छत्रपती नगर येथील श्री शिवशंभू मित्रमंडळाने भोरनजिकच्या रोहिडा म्हणजेच विचित्र गडाची हुबेहुब प्रतिकृती साकरली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, सौ. कुलकर्णी यांच्या हस्ते या प्रतिकृतीचे अनावरण करण्यात आले. रोहिडा गडाची हुबेहुब प्रतिकृती पाहण्यासाठी रत्नागिरीकरांनी गर्दी करायला सुरुवात केली असून किल्ला साकारनाऱ्या तरुण, तरुणींसह चिमुकल्यांचे रत्नागिरीकर कौतूक करत आहेत. सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्वर असा एक सुरेख डोंगरमार्ग आहे. या डोंगररांगेत ३ ते ४ किल्ले आहेत. यापैकी एक रोहीड खोऱ्यात वसलेला किल्ला म्हणजेच किल्ले रोहीडा. रोहीडखोरे हे नीरा नदीच्या खोऱ्याच्या काही भार- गात वसलेले आहे. या खोऱ्यात ४२ गावे होती. त्यापैकी ४१ गावे सध्याच्या पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात येतात. रोहीडा किल्ला हे रोहीड खोऱ्याचे प्रमुख ठिकाण होते. पुणे सातारा जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने, सहकारी दूधयोजना यामुळे येथील परिसरातील बहुतेक सर्व गावापर्यंत बस, वीज आदि सुविधा पोहचल्या आहेत. त्यामुळे येथील जीवन सुखी झालेले आहे. रोहीडा किल्ला भोरच्या दक्षिणेस सुमारे ६ मैलांवर आहे. रोहीडा किल्ल्याला विचित्रगड किंवा बिनीचा किल्ला असे देखील संबोधले जाते.
या किल्ल्याची निर्मिती ही यादवकालीन आहे. या किल्ल्यावरील तिसऱ्या वरवाजावर असणाऱ्या शिलालेखावरून मुहम् मद आदिलशाहीने ह्या गडाची दुरुस्ती केली असे अनुमान निघते. इ.स. १६६६ च्या पुरंदरच्या तहानुसार हा किल्ला मोघलांच्या स्वाधीन केला गेला. २४ जून इ.स. १६७० रोजी शिवरायांनी किल्ला परत घेतला. कान्होजी यांच्याकडे भोरची पूर्ण तर रोहीडा किल्ल्याची निम्मी देशमुखी व जमिनीचे काही तुकडे इनाम होते. रोहीडाचे गडकरी त्यांचेकडून ३० होन घेत होते. शिवाजी महाराजांच्या अधिकाऱ्यांनी शिवाजी महाराजांकडे विचारणा केली की ३० च होन का, शि- वाजी महाराजांनी निर्णय विला की, जेधे आपले चाकर असल्यामुळे पूर्वापार चालत आलेले द्रव्यच घ्यावे. पुढे किल्ला मोघलांनी जिंकला, मात्र भोरच्या पंत सचिवांनी औरंगजेबाशी झुंजून किल्ला स्वराज्यात पुन्हा दाखल केला. संस्थाने विलीन हाईपर्यंत राजगड, तोरणा, तुंग आणि तिकोना किल्ल्याप्रमाणे हा ही किल्ला भोरकरांकडे होता असा या किल्ल्याचा इतिहास आहे.
या किल्ल्यावर जाऊन तेथील वस्तूस्थितीचा अभ्यास करुन हा किल्ला साकारण्यात आला आहे. गौरव सावंत बंधू आणि मित्रपरिवाराने विपावलीनिमित्त छत्रपती नगर नाचणे रोड साळवी स्टॉप येथे श्री रोहिडा विचित्र गड किल्ल्याची भव्यदिव्य प्रतिकृती साकारली आहे. या किल्ल्यावर भैरव मंदिर, पुष्प कर्णी तलाव, दीपमाळ, भुयारी तलाव, हौद, तटब- ‘दी, महादरवाजा, ध्वज बुरुज, टाके, प्रवेशद्वार, तोफा, शिवरायांची अश्वरूढ मूर्ती, हौद, तुळशीवृंदावन अशी सजावट केलेली आहे.
हा किल्ला साकारण्यासाठी शौर्य गिरकर, शौर्य मांजरेकर, अखिलेश बांबाडे, श्रीयोग चव्हाण, सुधीर मावडी, आवेश शेलार, अथर्व शिंदे, तनिष रेडीज, कुणाल धूंदूर, अभिजित गिरकर, अजय रेडीज, वेदांत सावंत, वैभव पांचाळ, अथर्व खेडेकर, अथर्व बरे, विनय कदम, आर्यन चव्हाण, आकांक्षा चव्हाण, वेदिका चव्हाण, शिवांगी चव्हाण, नेहा सावंत, ऋषी दुधाणे, सिद्धू पुजारी, समृद्धी सावंत मनीषा मावडी, अंशिका शिंदे, प्रसाद सावंत, निखिल सावंत, गौरव सावंत रुचिक मुडे, राजस वने यानी हा श्री रोहिडा, विचीत्र गड साकारण्यासाठी १५ दिवस अहोरात्र मेहनत घेतली. या किल्ल्याची लांबी ३० फूट, रुंदी २५ फूट आणि उंची ४ फूट आहे. हा किल्ला पाहण्याची वेळ सायं ६ ते रात्रौ ११ वाजे पर्यंत खुला आहे. हा किल्ला त्रिपुरा पोर्णिमेपर्यंत पाहण्यासाठी खुला ठेवण्यात येणार आहे. किल्ला पाहण्यासाठी इतिहास प्रेमी व किल्ला प्रेमींची गर्दी होत आहे.
रत्नागिरी पोलिस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी यांनी रोहिडा, विचीत्र गड या किल्ल्याच्या प्रतिकृतीचे उद्घाटन केले . यावेळी त्यांनी किल्ल्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली. या कार्यक्रमावेळी सर्वांनी छ. शिवाजी महाराजांची आरती देखील म्हटली. या कार्यक्रमावेळी सौरभ मालुष्टे पत्रकार राजेंद्र चव्हाण आदी मान्यवर देखील उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 06-11-2024














