रत्नागिरी : नाणीज-तळवाडी येथील मारहाण प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी : तालुक्यातील नाणीज-तळवाडी येथे एकाला शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवार ३ नोव्हेंबर रोजी रात्री ११.३० ते ११.४५ वा. कालावधीत घडली आहे.

चिराग शरद खटकुळ (रा. नाणीज, रत्नागिरी) आणि अक्षय सुरेंद्र शिंदे (रा. सोमेश्वर, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. त्यांच्यविरोधात निखिल नारायण सावंत (रा. नाणीज, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, रविवारी रात्री संशयित हे आपल्या ताब्यातील गाडी (एमएच-४३- बीके-६२१०) वरुन फिर्यादी निखीलच्या घरासमोर गेले होते. त्याठिकाणी जाउन त्यांनी फिर्यादीला आपल्याकडील धारदार कुकरी शस्त्र दाखवून येथे कोण भाई झाले आहेत ते मला बघायचे आहेत अशी धमकी देउन शिवीगाळ केली.

या घटनेनंतर नंतर संशयितांनी फिर्यादीच्या चुलत भावाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. तेव्हा फिर्यादी त्याचा भाऊ आणि इतर गावातील प्रतिष्ठित व्यक्ति संशयित चिराग खटकुळच्या घरी गेले असता संशयित आरोपी चिराग आणि अक्षय शिंदे यांनी फिर्यादीशी झटापट केली. त्या नंतर संशयितांनी फिर्यादीला मारहाण व शिवीगाळ करुन धमकी दिली तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन केले.

या प्रकरणी संशयितांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५), सह महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१), १३५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १५,३५२,३५१(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल् आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 AM 06/Nov/2024