रत्नागिरी : शहरातील प्रमोद महाजन क्रीडा संकुलाजवळ दारूच्या नशेत असलेल्या वृद्धाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी करण्यात आली. प्रशांत रामकृष्ण मालगुंडकर (५८, रा. झाडगाव, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्यावर पोलिस हवालदार प्रविण वीर यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित हा क्रीडा संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळ मद्यधुंद अवस्थेत असताना ही कारवाई करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 AM 06/Nov/2024