रत्नागिरी : कुणबी सेवा संघ पुरस्कृत सेवाव्रती पांडुरंग शिंदे गुरूजी स्मृती पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गुरूजींनी केलेल्या या कार्याचा गौरव व्हावा, समाजामध्ये त्यांच्या कार्याविषयी जाणीव व्हावी या उद्देशाने गुरूजींच्या नावे स्वेवाव्रती पांडुरंग शिंदे गुरूजी स्मृती पुरस्कार २०१०-११ वर्षापासून सुरू करण्यात आला. हा पुरस्कार वितरण सोहळा जानेवारी २०२५ च्या पहिल्या पंधरवड्यात पाडुरंग शिंदे गुरूजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त होणार आहे. हे पुरस्कार जिल्ह्यातील सेवाभावनेने कार्य करणारे प्राथमिक शिक्षक (ग्रामीण शहरी विभाग), माध्यमिक शिक्षक, शेतकरी, कृषी विस्तार कार्यकर्ता व कृषी उद्योजक यांना देण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, मानपत्र व रोख रक्कम ५ हजार असे आहे.
इच्छुक उमेदवारांनी या पुरस्कारासाठी अर्ज पाठवावेत, असे आवाहन कुणबी सेवा संघ, दापोली यांच्याकडून करण्यात आले आहे. उमेदवारांनी स्वतःची किंवा पुरस्कर्त्यांनी वैयक्तीक माहिती समन्वयक सेवाव्रती पांडुरंग शिंदे गुरूजी स्मृती पुरस्कार समितीद्वारा नवभारत छात्रायलय, शिवाजीनगर दापोली ४१५७१२ रत्नागिरी यांच्याकडे २५ नोव्हेंबरपर्यंत किंवा तत्पूर्वी पोहोचेल, अशारितीने पाठवावी अथवा vsvnbc@gmail. com या मेलवर ई-मेल करावी. अधिक माहितीसाठी हरिश्चंद्र कोकमकर यांच्याशी संपर्क साधावा.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 06-11-2024














