बाळ मानेंच्या प्रचारसभेत उद्धव ठाकरेंनी भाजपवर डागली तोफ

◼️ सिंधुदुर्गात मोदींच्या अशुभ हातांनी छत्रपतींचा पुतळा उभारला

◼️ माज दाखवणाऱ्या भाजप च्या हातात आपल्याला राज्य द्यायचे आहे काय ?

◼️ भाजप चे हे हिंदुत्व मला मान्य नाही : उद्धव ठाकरे

रत्नागिरी : सिंधुदुर्गात मोदींच्या अशुभ हातांनी छत्रपतींचा पुतळा उभारला. हा पुतळा ८ महिन्यात पडला, त्यांनतर मोदिनी महाराष्ट्रात येऊन माफी मागितली, हा महाराष्ट्र तुम्हाला पुसून टाकल्याशिवाय राहणार नाही. पैशाचा माज दाखवून कुणालाही विकत घेणारे भाजप. हे भाजप, त्यांचे ते हिंदुत्व मला मान्य नाही, हा भाजप संघ वाल्यांना तरी मान्य आहे काय ? असा प्रश्न विचारात शिवसेना पक्ष प्रमुख उद्भव ठाकरे यांनी बाळ माने यांच्या प्रचार सभेत भाजप वर तोफ डागली. काही दिवसांपूर्वी भाजप विचारधारेशी एकरूप असणारे आणि शिवसेनेचे विद्यमान उमेदवार बाळ माने यांच्याच प्रचार सभेत उद्भव ठाकरे यांनी भाजप वर सडकून टीका केली.

ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांच्या प्रचारार्थ काल रत्नागिरीतील जलतरण तलाव जवळील मैदानात उद्भव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बोलताना उद्भव ठाकरे यांनी बीजेपी वर चौफेर हल्ला चढवला. संपूर्ण कोकणात मला मशाल धगधगली पाहिजे. कोकणच्या आणि महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय. पैशाचा माज दाखवून कुणालाही विकत घेता येत असा माज दाखवणाऱ्या भाजप च्या हातात आपल्याला राज्य द्यायचे आहे काय ? राजन साळवींच्या घरातील पुतळ्याची किंमत केलीत ? सिंधुदुर्गात मोदींच्या अशुभ हातांनी जो पुतळा उभारला होता त्याची किंमत केली की तुमची लायकी कळेल, त्याच्यात किती पैसे खाल्ले. पंतप्रधानांच्या हसते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होते आणि ८ महिन्यात महराजांचा पुतळा पडू शकतो ? आणि महाराष्ट्र ते सहन करू शकतो. मग मोदिनी महाराष्ट्रात येऊन धमकी देऊन माफी मागितली. महाराष्ट्र तुम्हाला पुसून टाकल्याशिवाय राहणार नाही असे ठाकरे म्हणाले.

मी घरी बसून महाराष्ट्राला सांभाळले, तुम्ही म्हणजे घरे फोडणारी औलाद. देवभाऊ, दाडी भाऊ आणि जॅकेट भाऊच्यात हिंमत असेल तर बदलापूर प्रकरणातील पीडित मुलीच्या आईला १५०० रुपये देण्याची हिंमत दाखवावी. याना फक्त आमदार कसे फोडायचे, सत्ता कशी आणायची येव्हढच माहित. राधानगरी मध्ये हक्काचे पाणी अदानी ला विकले. मुंबई विकली, कोल्हापूर मध्ये पाणी विकले, चंद्रपूर मध्ये शाळा अदानीला दिली. हा महाराष्ट्र कुणाचा आहे ? छत्रपती शिवाजी महाराजांचा की अदानी चा ? शाहू फुल्यांचा हा महाराष्ट्र आहे की मोदी आणि शहांचा हा महाराष्ट्र आहे ? या सर्व गोष्टी ठरवणारी ही निवडणूक आहे. महाराष्ट्राच्या हातात तुम्ही भिकेचा काटोर देणार आहेत का ? हा भाजप मला मान्य नाही. भाजप चे हे हिंदुत्व मला मान्य नाही. हा भाजप संघ वाल्यांना तरी मान्य आहे काय ? असा सवाल उद्भव ठाकरे यांनी या सभेत विचारला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 06-11-2024