रत्नागिरी : हातखंबा येथील माहेर संस्थेत दिवाळी सणाच्या निमित्ताने महिला व बालविकास आयुक्त यांच्या संकल्पनेतून दिवाळीचा एक दिवस आमच्यासोबत असा कार्यक्रम राबवण्यात आला. पाहुण्यांनी मुलांसोबत दिवाळीच्या फराळाचा आस्वाद घेतला.
माहेरमध्ये समाजातील अनाथ, निराधार, निराश्रित, काळजी आणि संरक्षणाची गरज असणारी बालके माहेर संस्थेत दाखल होतात. या मुलांबरोबर एक दिवस दिवाळी साजरी करून त्यांचा आनंद द्विगुणीत करणे गरजेचे असते. त्या अनुषंगाने स्थानिक शासकीय अधिकाऱ्यांना माहेर संस्थेत दिवाळीसाठी निमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव, पोलिस उपनिरीक्षक अश्विनी निखारगे, हातखंबा गावचे पोलिस पाटील अंकित तारवे, पोलिस कॉन्स्टेबल राहुल पावसकर, तलाठी प्रतिनिधी राजश्री आंबेकर, हातखंबा ग्रामपंचायत अधिकारी दीपक पाले, पोलिस कॉन्स्टेबल संकेत महाडिक, माहेर बालगृहाच्या अधीक्षका ऋतिका मरसकोल्हे, सामाजिक कार्यकर्ते शीतल हिवराळे आदी उपस्थित होते. सर्व प्रमुख पाहुण्यांनी संस्थेतील मुलांना मार्गदर्शन व दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. संस्थेचे प्रकल्पप्रमुख सामाजिक कार्यकर्ते सुनील कांबळे यांनी आभार मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:24 06-11-2024














