दापोली : डुक्कराच्या हल्ल्यात देगाव येथील तरुण जखमी

दापोली : सकाळच्या सुमारास जनावरे चरावयास घेऊन गेलेला देगाव येथील तरुण अनिल चिनकटे याच्यावर डुकराने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये चिनफटे हा तरुण जखमी झाला आहे. त्याच्यावर दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

देगाव येथील अनिल पांडुरंग चिनकटे हा तरुण मंगळवारी (ता. ५) सकाळी आठच्या सुमारास आपली जनावरे देगाव माळरानावर चरावयास घेऊन गेला. जनावरे चरत असताना पाठीमागून येऊन डुकराने अनिल याच्यावर हल्ला केला. त्याच्या दोन्ही हातांना व डाव्या पायाच्या मांडीला सुळ्याच्या साहाय्याने डुकराने जखमी केले. हल्ल्यानंतर अनिल हा जमिनीवर कोसळला व आरडाओरडा करू लागला. सुदैवाने त्याचा मोठा भाऊ सुनील चिनकटे हा जवळच असल्याने त्याने घटनास्थळी धाव घेत या डुकराला पळवून लावले, तसेच तातडीने पुढील उपचारासाठी ग्रामस्थांच्या साह्याने त्याला फणसू आरोग्य केंद्रात आणले. तिथे प्रथमोपचार करून अनिल चिनकटे यांना पुढील उपचारासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:27 PM 06/Nov/2024