संगमेश्वर : कळंबस्तेतील रामेश्वर पंचायतन मंदिरात कर्णेश्वर कला संगीत महोत्सव

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते साटलेवाडी येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर निर्मित रामेश्वर पंचायतन मंदिरात कर्णेश्वर कला संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत अहिल्यादेवींच्या पाऊलखुणा या कार्यक्रमाचे ६ ते ८ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे.

पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी जन्म महोत्सवी वर्ष सुरू आहे. या वर्षी दिनांक ६, ७ आणि ८ डिसेंबर रोजी श्री कर्णेश्वर कला संगीत महोत्सव होणार आहे. पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रेरणेतून व दानातून सरदार गानू यांच्या संकल्पनेतील श्री रामेश्वर पंचायतन मंदिर कळंबस्ते साटलेवाडी साकार झाले आहे.

इतिहास जागता ठेवावा या उद्देशाने श्री कर्णेश्वर कला संगीत महोत्सवाचे औचित्य साधून दि. ८ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता कळंबस्ते साटलेवाडी येथे प्राच्यविद्या अभ्यासक आशुतोष बापट यांच्यासमवेत मंदिर पाहणी, स्थापत्यशास्त्र, मूर्ती विज्ञान, इतिहास यांची कलात्मक माहिती घेऊन परिसराचा परिचय करून घेऊन यानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना आदरांजली अर्पण करण्याचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त कलाप्रेमींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:47 PM 06/Nov/2024