रत्नागिरी : मराठा मंडळाच्या वतीने रत्नागिरीत रविवार दि. 10 नोव्हेंबर 2024 रोजी वधू-वर व पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
हा मेळावा सकाळी 10 ते 3 या वेळेत रत्नागिरी शहरातील माळनाका येथे पार पडणार आहे.
मराठा समाजातील परस्परांशी वधू-वरांचा परिचय व्हावा तसेच विवाहइच्छूकांचे विवाह जुळून यावेत अशा उद्दात हेतूनेच मराठा मंडळाने या मेळाव्याचे आयोजन केले आहे. मंडळाच्या सुसज्ज व भव्य सभागृहात हा मेळावा घेण्यात येईल. या मेळाव्यासाठी उपवर वधू-वर व पालकांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ज्या उपवर वधू-वर तसेच त्याच्या पालकांना या मेळाव्यात सहभागी व्हायचे आहे, मात्र ज्यांची नावे नोंद केली नसतील त्यांनी 8 नोव्हेंबर पासून मंडळाच्या कार्यालयात नोंदणी करता येवू शकेल. अधिक माहितीसाठी मंडळाच्या 8010308846 या क्रमांकावर संपर्काचे आवाहन मराठा मंडळ, माळनाका तर्फे करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:19 06-11-2024














