उबाठाचे काम आता करणार नाही : उदय बने

रत्नागिरी : निष्ठावंत उदय बने यांना डावलून शिवसेना ठाकरे गटाने बाळ माने यांना दिलेली उमेदवारी आता उबाठा ला चांगलीच महागात पडत असल्याचे दिसत आहे. आता यापुढे उबाठा चे काम करणार नसल्याचा खुलासा शिवसेनेचे जेष्ठ नेते उदय बने यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केला आहे.

मी आजवर जबादारी मागूनही माझ्यावर कोणतीच जबाबदारी पक्षाने दिली नाही. आजच्या घडीला माझ्याकडे पक्षाचे कोणतेही पद नाही. त्यामुळे ठाकरे गटाचा प्रचार करण्याचा मुद्दाच नाही शिवसेना हा विषय आता मी थांबवला आहे. प्रचार सोडाच मात्र पक्षप्रमुख किंवा अन्य कोणा नेत्यांच्या सभा झाल्या तरी त्या सभांना उपस्थित राहणार नाही, अशी भूमिका उदय बने यांनी घेतली आहे.

काल उद्धव ठाकरे यांची रत्नागिरीत सभा झाली. या सभेला उदय बने यांची अनुपस्थिती विशेष चर्चेत राहिली. आता मात्र उदय बने यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. याचा फटका ठाकरे गटाला बसू शकतो, अशी शक्यता राजकीय वर्तुळात बोलली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:52 06-11-2024