Bullet Train Bridge Collapse : अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल कोसळला, तीन मजूर ठार; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले, बचावकार्य जारी

मुंबई : गुजरातच्या आनंद जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे. अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पातील बांधकाम सुरू असलेला एक पूल कोसळून अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल व आनंद पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी बचावकार्य सुरू केलं. आतापर्यंत चार मजुरांना ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या उपचार चालू आहेत. तसेच या अपघातात तीन मजुरांचा मृत्यू झाला आहे.

या अपघाताची माहिती मिळताच नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे (NHSRCL) अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. एनएचएसआरसीएल बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम करत आहे. एनएचएसआरसीएलने या घटनेनंतर एक निवेदन देखील जारी केलं आहे. यामध्ये म्हटलं आहे की आनंद येथील बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या बांधकामाच्या ठिकाणी काँक्रीटचे ब्लॉक कोसळले आहेत. या दुर्घटनेनंतर आम्ही मदत व बचावकार्य हाती घेतलं आहे. आनंद पोलील व अग्निशमन दलाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी बचाव मोहीम सुरू केली आहे. आम्ही बचाव मोहीमेवर लक्ष ठेवून आहोत. बचाव पथकाला लागणारी सर्व प्रकारची मदत तातडीने पुरवली जाईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:45 PM 06/Nov/2024