संगमेश्वर : मागील काही दिवसांपासून सायले पंचक्रोशीत भारत संचार निगमची सेवा विस्कळीत झाली आहे. ही समस्या कधी सुटेल, हा प्रश्न कायम आहे. सायले गावाच्या वेशीवर भारत संचारचा टॉवर आहे; परंतु या टॉवरमुळे पंचक्रोशीतील गावात भारत संचारची सेवा सुरळीत व्हायला हवी होती; पण त्या सेवेचा बोजवारा उडाला आहे.
ग्रामपंचायत, सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवी मंडळे यांनी वेळोवेळी निवेदने, तक्रारअर्ज दिले; पण त्या अर्जाची दखल घेऊन सेवा सुरळीत केली असं म्हणायला संधीच मिळाली नाही. मोबाईल रिचार्ज करण्यासाठी नाहक पैसे खर्च होत असल्याने ग्राहक संताप व्यक्त करत आहेत. महिनाभरात आठ-दहा दिवस नेटवर्क गायब असते, असे ग्रामस्थांनी सांगितले. रिचार्ज संपला की, कंपनी सेवा खंडित करते. मग जेव्हा सेवा पुरवली जात नाही त्या दिवसांचे आकारलेले पैसे कुणाच्या घशात जातात? असा रोखठोक प्रश्न ग्राहक विचारत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:20 PM 06/Nov/2024