राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी सुरभी, गौरी मध्यप्रदेशमध्ये रवाना

रत्नागिरी : राष्ट्रीय शालेय तायक्वांदो क्रीडा स्पर्धेचे आयोजन विदीशा मध्यप्रदेश येथे दि. ८ ते १२ नोंव्हेवर रोजी या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेकरिता गणराज क्लबच्या गौरी विलणकर व सुरभी पाटील यांची निवड झाली आहे.

गौरी व सुरभीला मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक प्रशांत मकवाना व महिला प्रमुख प्रशिक्षक आराध्या मकवाना यांचे मार्गदर्शन लाभत आहे. गौरी व सुरभीचे मुख्याध्यापक मोनिका जैसवाल, राकेश चव्हाण, राधा करमरकर, नवीन सावंत, सपना साप्ते, रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिदें यांनी अभिनंदन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 07-11-2024