रत्नागिरीतील दिलखुलास व्यक्तिमत्त्व, एसटी वाहक पप्पू उर्फ शैलेंद्र शंकर हातिस्कर यांचे निधन

रत्नागिरी : राज्य परिवहन मंडळ रत्नागिरी मधील एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व पप्पू उर्फ शैलेंद्र शंकर हातिस्कर यांचे काल रात्री १ च्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

आपले राहणीमान अतिशय टापटीप ठेऊन वाहकाची सेवा बजावणारे हतिस्कर हे महामंडळात लक्षवेधी ठरायचे. एखाद्या पोलीस अधिकाऱ्या सारखे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. आपल्या दिलखुलास व्यक्तिमत्त्वामुळे मोठा मित्रपरिवार त्यांनी जोडला होता. काल रात्री वयाच्या ६१ व्या वर्षी त्यांचे निधन झाल्याने मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे. तीन वर्षांपूर्वीच ते महामंडळाच्या सेवेतून निवृत्त झाले होते.

त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी आणि आई असा परिवार आहे. आज दुपारी ३ वाजता शैलेंद्र हातिस्कर यांच्या पार्थिवावर मिऱ्या येथे अंत्यसंकार होणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 07-11-2024