लांजा : गवाणे येथील तरुणाची गळफास घेत आत्महत्या

लांजा : लांजा तालुक्यातील गवाणे बौद्धवाडी येथील एका ३८ वर्षीय तरुणाने घराच्याशेजारी झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली.

बुधवारी पहाटे ५. ३० वाजता ही घटना उघडकीस आली. विनायक आनंद कांबळे (वय ३८, रा. गवाणे बौद्धवाडी, ता. लांजा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

या घटनेबाबात लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक कांबळे हा रिक्षा व्यवसाय करत होता. विनायक याचे लांजा येथील एका महिलेशी प्रेमसंबंध होते. याची माहिती त्याच्या घरच्यांना समजल्याने घरच्यानी विनायक याला सोबत घेऊन त्या महिलेकडे गेले. व दोघांनाही समज देऊन एकमेकांपासून दूर दूर राहण्यास सांगितले व दुर्लक्ष करून व्यवस्थित वागण्याचा सल्ला दिला. त्यानुसार दोघांनीही मान्य केले. मात्र, या प्रकारचा मनात राग धरून बुधवारी पहाटे ५.३० वाजता विनायक याने घराच्या शेजारी असलेल्या आंब्याच्या झाडाला रिक्षा केबलने गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत फिर्याद त्याचे वडील आनंद सयाजी कांबळे यांनी लांजा पोलिसांना दिली. पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अमोद सरंगळे करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 07-11-2024