रत्नागिरी : गावखडी-भंडारवाडी येथे काडतूसची बंदूक बाळगणाऱ्यावर गुन्हा

पावस : गावखडी-भंडारवाडी येथे सिंगल बॅरल काडतूसची बंदूक व रिकामी काडतूस बाळगल्याप्रकरणी वृद्धाविरूद्ध पूर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश दयाळ पेटकर (४५, रा. भंडारवाडी, गावखडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. ६) दुपारी भंडारवाडी येथील संशयिताच्या घराच्या मागील बाजूस उघड्यावर निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयिताच्या घराच्या मागील बाजूस विनापरवाना सिंगल बॅरल व रिकामे काडतूस बाळगलेल्या स्थितीत सापडले. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हेडकॉन्स्टेबल दीपराज पाटील यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 AM 07/Nov/2024