दापोली : तालुक्यातील फणसू पंचक्रोशीतील भागातील बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. यावर वनविभागाने बिबट्यास त्वरित ताब्यात घेऊन जंगलात सोडण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांमधून होत आहे.
बिबट्याने मंगळवारी (ता. ६) पहाटे ३.४५ वा. देगाव येथील रहिवासी कुटेकर गुरुजी यांच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला केला. दैव बलवत्तर म्हणून कुत्रा वाचला. तसेब काल कोंढे येथे एका रात्रीतच ४ जनावरांना बिबट्याने मारले. फणसू पंचक्रोशीत सध्या बिबट्याची दहशत वाढू लागली आहे. वनविभागाने याकडे गांभीयनि लक्ष देऊन या बिबट्याचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 AM 07/Nov/2024














