मंडणगड : दुधेरे आदिवासीवाडीत नक्षलवादी आल्याचा कॉल..

मंडणगड : दुधेरे आदिवासीवाडी येथे तीन नक्षलवादी आले आहेत. त्यांच्याकडे विस्फोटक द्रव्य आहे, अशी माहिती डायल ११२ नियंत्रण कक्षाला देऊन यंत्रणेची धावाधाव उडवून देणारा प्रकार उघड झाला. मंडणगड पोलिसांनी तत्काळ दुधेरे येथे शहानिशा केली. एकाने दारूच्या नशेत ही खोटी माहिती दिल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी संबंधित संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मंडणगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुधेरे आदिवासीवाडी येथून एकाने पोलिस हेल्पलाइन नंबर ११२/१०० वा धोलिस सांत्रण कक्षाला कॉल केला. दुधेरै आदिवासावीडी येथे तीन नक्षलवादी आले आहेत. त्यांच्याकडे विस्फोटक द्रव्य आहे, अशी माहिती दिली. त्यामुळे डायल ११२ नियंत्रण कक्षाकडून या विषयाबाबत मंडणगड पोलिस ठाण्याला कॉल आला. तत्काळ मंडणगड पोलिसांनी दुधेरे आदिवासीवाडी येथू जाऊन खात्री केली. कॉल करणारे त्यांची बायको व मुलगा यांच्या बरोबर त्यांचे सासुरवाडीत दुधेरे आदिवासीवाडी येथे राहतात. या घरातच नक्षलवादी असल्याचे व त्यांच्याकडे विस्फोटक द्रव्य ठेवलेली असल्याचे कॉलर यांनी सांगितले होते. त्यामुळे पोलिसांनी कॉलरचे सासरे यांचे घर व घराबाहेरील परिसर तसेच आजुबाजू‌चा परिसर येथे तपासणी केली. पोलिसांना कॉलरचे यांनी सांगितल्याप्रमाणे कोणतीही परिस्थिती आढळली नाही. पोलिसांनी आजुबाजूला चौकशी केली असता असे काहीही घडले नसल्याचे सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 AM 07/Nov/2024