राजापूर मतदारसंघात प्रशासनाकडून पथनाट्याद्वारे जनजागृती

राजापूर : विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढावा म्हणून राजापूर विधानसभा मतदार संघामध्ये प्रशासनाकडून पथनाट्याद्वारे जनजागृती केली जात आहे. त्यात ‘काठी नी पोंगडी घेऊया की रं… मला बी मतदानाला येऊ द्या की..’, ‘मतदार राजा कर्तव्याला जाग रे….’ अशा पथनाट्यातून काव्यमय पंक्ती सादर करत लांजा कोर्ले येथील त्यास शाहिर कांशिराम जाधव आणि स्मार्ट सहकाऱ्यांकडून मतदारांचे प्रबोधन केले जात आहे.

राजापूर शहरातील बसस्थानक, बाजारपेठ, ग्रामपंचायती, प्रशासकीय झाली कार्यालये आदी सार्वजनिक ठिकाणी क्रार पथनाट्यांचे सादरीकरण केले जात आहे. निवडणुकीमध्ये मतदानाचा घटणाऱ्या टक्क्याबाबत साऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाकडून मतदारांमध्ये जनजागृती करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

राजापूर विधानसभा मतदार संघामध्ये सार्वजनिक ठिकाणी पथनाट्याचे सादरीकरण करत मतदारांचे लक्ष वेधून घेतले जात आहे. कोर्ले येथील शाहीर कांशिराम जाधव आणि सहकाऱ्यांच्या पथनाट्य सादरीकरणाला मतदान जनजागृती स्वीपचे प्रमुख वा नोडल अधिकारी विनोद सावंग, स्वीप टीमचे सदस्य विजय विश्वासराव, दिलीप चव्हाण, प्रदीप मड़वी, महादेव बंडगर, सुनील खांडेकर यांचे महत्वपूर्ण सहकार्य आणि मार्गदर्शन लाभत आहे. यामध्ये ‘दिला हक्क संविधानानं… चला करू मतदान’, ‘काठी नी घोंगडी घेऊया की रं… मला बी मतदानाला येऊ द्या की..’, ‘मतदार राजा कर्तव्याला जाग रे..’, ‘चला साऱ्यांनी करूया मतदान….. दिला पवित्र हक्क संविधानानं.. अशी विविध मतदान जनजागृतीच्या गीतांचे सादरीकरण करत मतदारांमध्ये जनजागृती केली जात आहे. त्याला लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसादही मिळताना दिसत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 AM 07/Nov/2024