चिपळूण : चिपळूण आगाराची लालपरी पंढरपूर कार्तिकी वारीसह काशी-अयोध्या-प्रयागराज” यात्रेसाठी सज्ज झाली आहे. या यात्रेसाठी तालुक्यातील वारकरी सांप्रदाय कळंबस्ते, कामथे, आंबडस यांच्या माध्यमातून नियोजन करण्यात आले आहे. या सांप्रदायाचे कार्तिकी वारीचे हे ४४वे वर्षे आहे. ही सांप्रदाय मंडळी यावर्षी पंढरपूर, काशी, अयोध्या, प्रयागराज व इतर अनेक तीर्थक्षेत्रे असा एकूण १२ दिवसांचा सुमारे ४५०० किमीचा प्रवास करणार आहेत. या यात्रेसाठी चिपळूण आगारामधून सुसह्य व आरामदायी बस देण्यात येणार आहेत.
बस ११ नोव्हेंबरला सकाळी ८ वाजता श्रीफळ वाढवून चिपळूण आगारातून रवाना होणार आहे. वारकरी मंडळींना जी नेहमीच सेवाभावीवृत्तीने तत्पर सेवा देणारे चिपळूण आगारातील कर्मचारी, कार्यशाळा प्रमुख गुढेकर, आगारप्रमुख दीपक चव्हाण यांनी उपक्रमासाठी विशेष प्रयत्न केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 PM 07/Nov/2024














