चिपळूण : धामणदेवी येथे मद्यविक्री करणाऱ्यावर कारवाई

चिपळूण : शहरानजीकच्या धामणदेवी रस्त्यानजीक असलेल्या स्मशानभूमी शेडमागे अवैध मद्यविक्री करीत असल्याच्या माहितीवरून चिपळूण पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून गोवा बनावटीच्या मद्याच्या आठ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.

शहरानजिकच्या धामणदेवी रस्त्यानजिक असलेल्या स्मशान शेडच्या मागे सोमवारी रात्री ९.४५ च्या सुमारास वसंत येसू पडवेकर (७०, रा. पेढे कुंभारवाडी) हे अवैद्ध दारू व्यवसाय करीत असल्याचे आढळून आले. यावेळी पोलिसांनी अधिक तपास व चौकशी केली असता, संबंधिताकडे सुमारे विविध ग्रॅण्डच्या गोवा बनावटीच्या आठ बाटल्या आढळून आल्या. २८० रुपयांच्या चार तर ७० रुपयांच्या चार अशा गोवा बनावटीच्या मद्याच्या बाटल्या संशयिताकडून ताब्यात घेण्यात आल्या असून संबंधितावर चिपळूण पोलिसांनी कारवाई केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:18 07-11-2024