रत्नागिरी : तालुक्यातील मंडणगड-शिपोळे येथे बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची ९०० रुपयांची १० लिटर दारू विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगणाऱ्या विरोधात बाणकोट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवार ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वा. करण्यात आली. संतोष यशवंत भागणे (४५, रा. मंडणगड, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस अंमलदार विजय वळवी यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, मंगळवारी सायंकाळी तो शिपोळे गावालगत झाडी-झुडपांमध्ये गावठी हातभट्टीची १० लिटर दारू विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:19 PM 07/Nov/2024














