गुहागर : गुहागर विधानसभा मतदारसंघात यावेळी सुमारे २ लाख ४२ हजार ७०४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. एकूण ३२२ केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा जास्त असल्याने महिला मतदार कोणाला मत देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
विभाजनानंतर गुहागर-खेड- चिपळूण अशा तीन तालुक्यांत गुहागर मतदारसंघ विभागला गेला आहे. यामुळे खेड व चिपळूण तालुक्यांतील काही गावांचा या मतदारसंघात समावेश झाला आहे. पूर्वी खेड, चिपळूण व गुहागर तालुक्यांचा स्वतंत्र मतदारसंघ असल्याने प्रत्येक तालुक्यातील आमदार निवडून येत होते. मात्र, विभाजन झाल्यानंतर खेड- चिपळूण या तालुक्यांतील काही भाग गुहागर विधानसभा मतदारसंघात जोडला गेला. यामुळे तीन तालुके मिळून हा मतदारसंघ नव्याने तयार झाला.
गुहागर विधानसभा मतदारसंघात ३२२ मतदान केंद्रे आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी सुमारे २ लाख ४२ हजार ७०४ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या १ लाख १५ हजार ५११ तर स्त्री मतदारांची संख्या १ लाख २७ हजार १९३ आहे. त्यामुळे उमेदवाराच्या विजयात स्त्री मतदार महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:40 PM 07/Nov/2024














